बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:57 IST)

अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडण्याबाबत हसन मुश्रीफ यांचा दुजोरा

अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा बँक, विधानपरिषद आदींच्या निवडणुका असल्याने दोन्ही ठिकाणी लक्ष देणे अवघड असल्याने आणि गृहजिल्हा कोल्हापूर असल्याने तिकडे लक्ष देणे गरजेचे असल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मुक्त करावे अशी विनंती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती ग्रामविकास तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
 
आगामी काळात कोल्हापूरला आणि अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असल्याने दोन्हीकडे लक्ष देणे जमणार नाही. 12 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात जाऊन प्रचार करणं शक्य होणार नाही,त्यामुळे मी कोल्हापूरची जबाबदारी घेतो असं मत व्यक्त केले, मात्र हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, जोपर्यंत अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे काम करून विकास करणार असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
 
मी सातत्याने माझ्या नेत्यांविषयी बोलतो. त्यामुळे टार्गेट करायचं ठरवलं मात्र दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात लबाडी किंवा बेईमानी केली नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. तसेच सरकार पडत नसल्याने सातत्याने बदनाम करून अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहेय मात्र ते यशस्वी होणार नाही असा पलटवार देखील मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांवर केला.
 
तसेच अजितदादांनी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. एखाद्याला टार्गेट करणं योग्य नाही त्यांना आणि कुटूंबियांना जे टार्गेट केले जाताय ते चुकीचय. तर अजितदादांना खटला दाखल करायला वेळ नाही उलट त्यांनी सांगितले किती प्रामाणिकपणे नातेवाईकांनी हा कारखाना चालवलाय, असे हसन मुश्रीफ म्हणाले.