1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (09:27 IST)

तो पोलिस कर्मचारी झाला महिलेसमोर नग्न, केले अश्लिल हावभाव

became a police employee
मुंबई पोलीस दलात यंत्रणेला लाजविणारी घटना समोर आली आहे. जे रक्षण करण्यासाठी आहेत त्यातील एकाने हे संतापजनक कृत्य केले आहे. नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसमोर पोलीस कॉन्स्टेबल नग्न झाला होता, तो इथेच थांबला नाही तर त्याने या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव देखील केले होते. या संतापजनक प्रकारामुळे महिलेने नेहरूनगर पोलीस ठाण्यात पोलीस कॉनस्टेबल हरिशचंद्र लहाने (वय-४३) याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या घटनेची संपूर्ण तपासणी करत पोलिसांनी कॉन्स्टेबल लहाने याला अटक केली.
 
ही पीडित महिला तिच्या  घराच्या बाल्कनीत बसली होती. त्यावेळी समोरच्या घरात राहणाऱ्या लहाने याने महिलेला पाहिले आणि  अश्लील शेरेबाजी करायला सुरुवात केली. हे करून तो घरात गेला. पुन्हा बाहेर येऊन त्याने नग्न होऊन तिच्याकडे पहात अश्लील हावभाव केले. त्यामुळे प्रचंड  घाबरलेल्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षास फोन केला आणि सर्व माहिती देत मदत मागितली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनेची चौकशी केली आणि लगेच लहाने याला अटक केली. हरिशचंद्र लहाने पंतनगर पोलीस ठाण्यात काम करतो. मात्र मागील तीन महिन्यांपासून तो गैरहजर होता, त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती वरिष्ठांकडून सांगण्यात आली आहे.