शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (09:14 IST)

व्यायामाला जातो सांगून घराबाहेर पडले, शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू

He fell out of the house saying he was going to exercise
व्यायामाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा-पंढरपूर रोडवर घडली. शहदाब अमजद रजबअली (वय-11) व त्याचा मित्र प्रज्वल हेमंत लोहार (वय-10 दोघे रा. किल्ला परिसर, मंगळवेढा) असे मृत्यू झालेल्या दोन मुलांची नावे आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी आपल्या लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी एकटं पाठवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लहान मुलांना पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणी जाणास मनाई केली आहे.लहान मुलांनी एकट्याने तिथ जाऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.

पाण्याच्या स्त्रोताजवळ कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षेची काळजी घेतली जाते.प्रत्येकाने शेततळ्याजवळ सुरक्षेची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे.