1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (08:25 IST)

चौकशीला सामोरं जावं लागणार आणि तुरुंगातही जावं लागणार

He will have to face interrogation and even go to jail Maharashtra news regional marathi news in marathi  Kirit Somaiya webdunia marathi
राष्ट्रवादी नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ४ कोटी २० लाख संपत्तीवर ईडीने कारवाई करुन जप्त केली आहे. याचाच धागा पकडून माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागणार असा दावा केला आहे.अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहत नाहीत परंतु त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आणि तुरुंगातही जावं लागणार अशी खात्री आहे. किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे.
 
माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये सोमैय्या यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुख यांनी १०० कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. नागपूर, मुंबई,उरण, जेएनपीटी येथे जमीन घेणे आपला पैसा चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे याचा हिशोब आता ईडी मागत आहे. अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीसाठी समोर यावं लागणार आहे. १०० कोटीचा आर्थिक घोटाळा आणि अवैध संपत्तीमुळे जेलमध्ये जावं लागणार असा दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.