रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (16:15 IST)

राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे राज्यात पावसाचं वातावरण तयार झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
 
विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. अशात आता राज्यात आज आणि उद्या थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.