Widgets Magazine
Widgets Magazine

राज्यात पावसाचे पुनरागमन

पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झाल्यामुळे झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत विस्तारित असल्याने पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच आगामी चोवीस तासात कोकण व गोव्याच्या काही भागात मुसळधार तर राज्यात अनेक भागात पावसाच्या चांगल्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 
rain
तळकोकणात गेल्या दोन दिवसापासून धुवाधर पाऊस कोसळत असून करूळ घाटात दरड कोसळली. गगनबावड्यापासून 2 किमी अंतरावर ही दरड कोसळली. भुईबावडा घाटातही पतझड सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
मुंबई व कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पुढील 24 तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. मुंबईत काही भागात मुसळधार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल. चार दिवसानंतर म्हणजे गुरूवारनंतर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शाळेने दिला सुसाइड नोट लिहायचा होमवर्क

लंडन- ब्रिटनच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चक्क सुसाइड नोट अर्थात ...

news

मुंबई: जुलैत म्हाडाची 800 घरांसाठी जाहिरात

मुंबईतल्या म्हाडाच्या सुमारे 800 घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया ...

news

कर्जमुक्त शेतकर्‍यांची यादी बँकेच्या बाहेर लावा: उद्धव ठाकरे

राज्यातला शेतकरी खरंच कर्जमुक्त होतोय का हे पाहण्यासाठी मी फिरतोय असे उद्धव ठाकरे यांनी ...

news

काश्मीरमध्ये स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची

काश्मीरमध्ये स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची

Widgets Magazine