मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (16:39 IST)

अकोला दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला राज्य सरकार कडून मदत

पारस जिल्हा अकोला येथे बाबूजी महाराज संस्थानात सभा मंडपात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले.अपघात झाला तेव्हा रविवारी समर्थ बाबूजी महाराज संस्थानात भाविकांची मोठी गर्दी होती .संध्याकाळी आरती झाल्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. काही भाविक पावसापासून  बचावासाठी  शेडखाली थांबले दुर्देवाने त्याशेडवर कडुनिंबाचे मोठे झाड कोसळले त्यात 7 जणांचा मृत्यू झाला.तर 35 जण जखमी झाले .या अपघातांबाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला 
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.        
 
Edited By - Priya Dixit