1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (08:40 IST)

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

High Court quashes work on Mumbai - Goa four-laning highway
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु असून हे काम वेळेत होण्याबाबत महामार्गने शंकाही उपस्थित केली आहे. महामार्गच्या कामाची गती वाढवा आणि तीन महिन्यात त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने  राज्य सरकारला दिले आहेत. 
 
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. यासंदर्भातली जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी केली आहे.
 
मुंबई - गोवा महामार्गाचे काम 2011मध्ये सुरु करण्यात आले. मात्र, अद्याप कामा पूर्णत्वाला गेलेले नाही. दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मोठ्या प्रमाणात काम अद्याप अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन जाताना धुळीचा आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच या महामार्गाचे काम संथगतीने सुरु आहे. तसेच या महामार्गावर अपघातचे प्रमाणही वाढले आहे. काही ठिकाणी काम रखडल्याने अपघाताचा धोका आहे.
 
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप असे एकणून 366.17 किमी. लांबीतील चौपदरीकणाचे काँक्रिटीकरणाचे काम राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडून करण्यात येत आहे. यातील 67.54 टक्के अर्थात 214.64 किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगती पथावर आहे. यासंदर्भात आढावा बैठका घेण्यात येतील, अशी माहिती विधानसभेत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.