मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (17:03 IST)

आधी सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा : हायकोर्ट

सहकारी साखर कारखान्यांतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची समाजसेवक अण्णा हजारे यांनी याचिकेद्वारे केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास फेटाळली आहे. आधी संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, असे आदेश न्यायालयाने अण्णा हजारे यांना दिले आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर आदेश देऊ, असेही न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे. विशेष म्हणजे सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप हजारे यांनी केला होता. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली होती. अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन दिवाणी आणि एक फौजदारी याचिका दाखल केली आहे.