1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (11:44 IST)

मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ, खरीप हंगामात 8 हजारहून अधिक गावांना 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी

drought
यंदा मराठवाड्याला खरीप हंगामात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असून कृषी विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आणेवारीनुसार मराठवाड्यातील 8 हजार 496 गावांमध्ये सरासरी खरीप आणेवारी केवळ 47.42 टक्के इतकी राहिली आहे. 
 
मान्सूनच्या उशिरा आल्याने पेरणी लांबली आणि नंतर अतिवृष्टीमुळे तसेच पावसाच्या लांबलेल्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली. यामुळे खरीप ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, हरभरा या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जमिनीचे धूपण झाले तर काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिके कोमेजली गेली. शेतकर्‍यांच्या हाती कमी पिक लागले. 
 
नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 653, धाराशिव जिल्ह्यातील 719, परभणी जिल्ह्यातील 832, जालना जिल्ह्यातील 971, लातू जिल्ह्यातील 952 बीड जिल्ह्यातील 1 हजार 397, हिंगोली जिल्ह्यातील 707 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 हजार 356 गावांचा समावेश असलेल्या या दुष्काळग्रस्त विभागात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बर्‍याच ठिकाणी तर 40 टक्क्यांपेक्षाही कमी आणेवारी झाली आहे. 
 
दरवर्षीप्रमाणे 31 ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाच्या पिकांची सुधारीत आणेवारी जाहीर झाल्यानंतर आता 15 डिसेंबर रोजी अंतिम आणेवारी घोषित करण्यात आली आहे.