रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (12:42 IST)

नवऱ्या बायकोच्या भांडणातून पेटवलं घर

नवरा आणि बायको हे नातं घट्ट असतं. नवरा बायकोमध्ये वाद होतातच पण हे वाद विकोपाला जाऊ नये. नाहीतर त्याचा परिणाम दोघांना भोगावा लागतो. कारण वादाच्या रागातून काहीवेळा असे घडते जे कल्पनेच्या पलीकडील असते. असेच काही घडले आहे सोलापूरच्या गोदूताई विडी घरकुल रोड वरील माळी नगरात इथे राहणाऱ्या एका नवऱ्या आणि बायकोमध्ये सतत भांडण होत असे. मागील चार दिवसापासून दोघांमध्ये भांडण सुरु होते.  त्याने भांडणाच्या दरम्यान बायकोला घराला पेटवून देण्याची धमकी दिली .असे त्यांनी शेजाऱ्यांना देखील बोलून दाखवले होते. त्यामुळे शेजारी काळजीत होते.  त्याला बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग आला आणि त्याने रागाच्या भरात येऊन घराला पेटवून दिले. श्याम भंडारी असे या घर पेटवणाऱ्याचे नाव आहे. 
 
भांडणानंतर त्यांची बायको आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली असता श्याम भंडारी यांनी घराला आग लावली आणि घराबाहेर निघून गेले. शेजाऱ्यांनी आग लागलेली बघता तातडीने पोलिसांना आणि अग्निशमनदलाला बोलावले.त्यांनी पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवला. आगीत शेजाऱ्यांच्या घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. श्याम भंडारी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आग लावण्याची तक्रार केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.