शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (07:37 IST)

पुतण्या सांगेल तेव्हाच मी थांबेन!

chagan bhujbal
I will stop only when my nephew tells me माझे वय झाल्याने माझा पुतण्याने मला थांबायला सांगितल्यास मी नक्की थांबेन, अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. समतेचा विचार बाजूला ठेवलेला नाही. त्यामुळे समतेच्या विचारांविरोधात असणाऱ्यांबरोबर माझी लढाई कायम राहणार आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेते प्रिय असल्याने तटस्थ राहणार असल्याचे वल्लभ बेनके यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आमदार बेनके यांची भेट घेत निर्णायाचा फेरविचार करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर टीका केली. पुण्यातील समता भूमी येथेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.