शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:27 IST)

उठाव शिवसेना संपवण्यासाठी नाही तर…; आमदार सदा सरवणकरांनी व्यक्त केली खंत

sada sarvankar
एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत भूकंप झाला. शिंदेंसोबत ४० हून अधिक आमदार गेले. यांनतर शिंदे आणि भाजप सरकार सत्तेत आलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याजवळील नेत्यांवर , राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप करताना दिसत आहेत. बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी ही आपली खंत व्यक्त केली आहे.
 
आम्ही शिवसेना सोडलेली नाही. परंतु या सगळ्यासाठी कोणीतरी उठाव करण्याची गरज होती, तो उठाव आम्ही केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केलं. या मतदारांच्या आणि नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात, हीच त्यामागची भावना आहे, अशी खंत शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केली आहे.
 
उद्धव ठाकरेंवर आमची नाराजी नाही
सदा सरवणकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय की, ज्या आमदारांचे त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सुटत नव्हते. तसेच जे आमदार त्यादृष्टीने बघत होते, त्याचाच हा भाग असावा. लोकांचे प्रश्न सुटत नसल्याने पक्षाचा राजीनामा देण्यासाठी मी मानसिकता बनवली होती. परंतु अशा प्रकारचा जर उठाव होणार असेल तर त्यामध्ये मी सामील झालो.