शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (08:31 IST)

मुंबईतील 24 वार्डात महिला बचतगटांना आठवडा बाजाराचा सुरू करण्यात येत आहे

mangal prbhat lodha
मुंबईतील 24 वार्डात महिला बचतगटांना त्यांचा व्यवसाय करता यावा व त्यांना स्वयंरोजगारातून उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक उत्पन्न मिळावे या उद्देशाने आठवडा बाजार सुरू करण्यात येत आहेत.

घाटकोपर ( पूर्व) सुचित्रा बिझनेस पार्क, बीएमसी पार्किंग, पटेल चौक येथे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सदर आठवडr बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिला बचतगटांना व्यवसायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डात आठवडr बाजार सुरु करण्यात येईल, अशी घोषणा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.

तक्रारीनंतर आली संकल्पना पुढे
महिला बचत गटातील महिलांना व्यवसायासाठी बळ मिळावे, त्यांचा व्यापार वृध्दींगत व्हावा या उद्देशाने लोढा यांनी आठवडी बाजार सुरू करण्याची संकल्पना सुचवली. काही महिला बचतगटांनी त्यांना आठवडा बाजार सुरू करायचा असून हक्काची व कायम स्वरूपी जागा मिळत नसल्याची तक्रार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली होती.
 
Edited By - Ratnadeep ranshoor