1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2022 (11:11 IST)

रागाच्या भरात येऊन बायकोला चालत्या रिक्षेतून ढकलले, ठाण्यातील घटना

The incident took place on December 17 in Wagle Estate Indiranagar area of Thane
नवरा बायकोचं नातं जन्मोजन्मीचे आहे असं म्हणतात. हे नातं अतूट असत. पण नवरा बायकोच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. बायकोने नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात नवऱ्याने तिला चक्क चालत्या रिक्षेतून ढकलून दिले. एवढेच नाही तर दुखापत झालेल्या बायकोला रुग्णालयात नेण्या ऐवजी त्याने घरी नेऊन तिला रॉड ने मारहाण केली. या मारहाणीत पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
 
सदर घटना 17 डिसेंबरची ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरातील आहे. कृष्णानंद सिंग हा रिक्षा चालवतो आणि पत्नीसह राहतो. त्याला नशा करण्याची सवय आहे. त्याने नशा करण्यासाठी पत्नी कडे पैसे मागितले. पत्नीने पगार अजून झाला नाही असे सांगून नकार दिल्यावर त्याने तिच्या कामाच्या स्थळी जाऊन तिला मारहाण केली आणि फरफडत बाहेर काढले आणि बळजबरी रिक्षात बसवले 

त्याने हायवे वर आल्यावर बायकोला चालत्या रिक्षेतून बाहेर ढकलले. महिला जखमी झाली नंतर 
नवऱ्याने तिला जखमी अवस्थेत घरी आणून लोखण्डी रॉड ने मारहाण केली. नंतर महिलेच्या सासरच्या मंडळीने तिला पडली सांगून रुग्णालयात दाखल केले. नॅबऱ्याने बायकोला पुन्हा घरी आणले आणि मारहाण केली. बायकोने कसाबसा पळ काढून आपल्या बहिणीचे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. बहिणीने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार  सुरु आहे. बहिणीला पीडित महिलेने सांगितले की आरोपी कृष्णानंद हा गेल्या 8 वर्षांपासून महिलेचा शारेरिक आणि मानसिक छळ  करत आहे. पीडित महिलेच्या बहिणीने पोलिसात आरोपीची तक्रार केली असून पोलिसांकडून पीडित महिलेचा जबाब नोंदला जात आहे.  
 
 
Edited By- Priya Dixit