शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (11:55 IST)

चंद्रपुरात घर 70 फुट खाली गाडलं गेलं

home
चंद्रपुरातील घुग्गुस शहरात कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात बघता बघता एक घर चक्क 70 फूट जमिनीत उभं गाडलं गेलं.पाय खालची जमीन सरकण्याचं प्रत्यय अक्षरश: पाहायला मिळालं.

चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस शहरात गजानन मडावी यांचं हे घर कोळसा खाणींच्या जवळ  होतं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात शहरा शेजारी सर्वत्र  भूमिगत कोळसा खाणी आहे. सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पण अशी घटना प्रथमच घडल्याचे सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी अचानक गजानन मडावी यांना राहत्या घरात हादरे पडल्याचे आणि घर हलू लागल्याचे जाणवले . ते घाबरून कुटुंबासह बाहेर पडले आणि पाहता-पाहता त्यांचे राहते घर 70 फूट जमिनीत गाडले गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि भीती पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिसरातील वीज पुरवठा बंद केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.