शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (16:53 IST)

महाराष्ट्रातील पहलवान बाळ आले जन्माला

कोल्हापूर ही सिटी म्हणजे शाहू महाराज आणि पहलवानाची आहे. मात्र यात आता अजून भर पडली असून सर्वाधिक वजनाचे बाळ कोल्हापुरात जन्मले आहे. यात विशेष असे की हे बाळ  जन्मताच  पाच किलो वजनाचे असून त्याची  उंची दोन फूट आहे. यामध्ये गर्भवती महिलेस मधुमेहाचा विकार असेल तर बाळाचे वजन वाढण्याची शक्यता असते.  बाळाचा आकार आणि वजन अधिक असेल तर नैसर्गिक प्रसूती होत नाही तर उलट  आईसह बाळालाही धोका असतो. मात्र यामध्ये  स्वाती राहुल किणीकर या निरोगी आहे.  दिवस पूर्ण झाल्यावर  नैसर्गिक प्रसूती झाली आहे. बाळाचे वजन आणि उंची तपासल्यानंतर या बाळच वजन महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.