गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2023 (16:37 IST)

Mumbai : मुंबईच्या AC लोकल मध्ये महिलांची जुंपली, व्हिडीओ व्हायरल

social media
Women Fight In AC Local  : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन म्हणवली जाते. मुंबईकरांच्या जीवनाचा एक अभाज्य घटक मुंबईची लोकल आहे. सकाळ तर रात्रीचा प्रवास या लोकल मध्ये केला जातो. मुंबईकरांसाठी लोकलच्या अनेक गोड आठवणी आहेत. मुंबईच्या लोकलमध्ये धमाल करणारे व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात मग ते डान्सचे असो किंवा जागेसाठी हाणामारी करणारे प्रवाशी असो. 

मुंबईच्या लोकलच्या प्रवासात अनेक घटना घडत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होतात. सध्या दोन महिलांचा भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आधी शाब्दिक बाचाबाची सुरु होते नंतर हाणामारी होते. एका सीटवरून हे भांडण झाले असल्याचे समजले . 
हा व्हिडीओ मुंबईच्या एसी लोकलचा आहे. बसण्याचा सीटवरून या महिलांचे बोलणे सुरु होते नंतर त्यांच्यात वाद होतो. हा वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात थेट हाणामारी सुरु होते.या मध्ये या महिला एकमेकींशी चक्क इंग्रजीमधून भांडत आहे. तर दोन महिला त्यांच्यातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे.  
 
हा व्हिडीओ रॉड्स ऑफ मुंबई या अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये सीटवरून एक मुलगी इंग्रजीमधून संभाषण करत आहे.मुलगी बाचाबाची करून नंतर थेट महिलेच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करत आहे. इतर महिला त्यांची भांडणे सोडवत आहे. मुलगी चांगलीच संतापली आहे.  या व्हिडीओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहे.   

Edited by - Priya Dixit