शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (19:12 IST)

नवी मुंबईत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक,1 कोटींचा गंडा घातला

cyber halla
सध्या ऑनलाईन फसवणूक सुरु आहे.सायबर चोरटे नव्या नव्या पद्धतीने ग्राहकांना फसवत आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेंडिंगच्या नावाने फसवणूक करून एका व्यक्तीला चक्क 1 कोटींचा गंडा घातला आहे. शेअर ट्रेंडिंग मध्ये चांगला परतावा मिळेल असा आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली. 
 
या प्रकरणाची माहिती देताना नवी मुंबई सायबर पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की, रविवारी या संदर्भात ॲप आणि वेबसाइटच्या मालकांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सविस्तर चौकशी केली जाईल 

त्यांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांनी 13 फेब्रुवारी ते 5 मे दरम्यान खारघर येथील पीडित महिलेशी विविध प्रसंगी संपर्क साधता शेअर ट्रेंडिंग मध्ये चांगला परतावा मिळाल्याचे आमिष दाखवले. त्यांनी अमिषाला बळी पडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे जमा केले. महिलेने जवळपास  1,07,09,000 रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा केले. मात्र जेव्हा त्यांनी पैसे परत मागितल्यावर सायबर चोरट्यांनी काहीच उत्तर दिले नाही.त्यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. नंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. 
 
पोलिसांनी रविवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 419 (तोतयागिरीने फसवणूक), 420 (फसवणूक) आणि 34 (सामान्य हेतू) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.  
 
Edited by - Priya Dixit