शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (21:23 IST)

लवकरच महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग सुरु होईल, अनिल देशमुख यांचा दावा

भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संपर्कात भाजपचे नेते आहेत. आता राजकारणाची हवा बदलली आहे. लवकरच महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग सुरु होईल, असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.  गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे.  “पुणे, नागपूर, अमरावती किंवा वर्धा असो, प्रत्येक जिल्ह्यातील भाजपचे अनेक मोठे नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. भाजपचे मोठे नेते काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार आहे. पुढील काळात तुम्हाला सर्व नेत्यांची नावं समजतील. ज्या नेत्यांना ज्या पक्षामध्ये जायचं आहे त्या पक्षात जातील. पुढील काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.