गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (11:52 IST)

पहिली महिला गुप्तहेराला अटक

धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या देशातील अर्थात भारतातील प्रथम प्रायव्हेट म्हणजेच खासगी महिला गुप्तहेर रजनी शांताराम पंडित (55) यांनाठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने दादर येथून अटक केली आहे. रजनी या मागील  27 वर्ष प्रायव्हेट डिटेक्टटिव्ह अशी  एजन्सी चालवत आहेत. रजनी  यांना दिल्लीतील कॉल डिटेल्स रेकॉडर्स अर्थात सीडीआर विकणार्‍या टोळीकडून बेकायदेशीरपणे सीडीआर विकत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.  यामध्ये त्यांना आज  शनिवारी न्यायालयात हजर करणार आहेत. यामध्ये  विमा कंपन्यांना आणि खासगी गुप्तहेरांना  10 ते 12 हजार रुपयांच्या मोबदल्यात  सीडीआर विकणारी टोळी आहे. याच  टोळीचा ठाणे पोलिसांनी शोध लावला आहे. पोलिसांनी कारवाई करत  वाशीतील ग्लोब डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मालकासह चार गुप्तहेरांना अटक केली असून सीडीआर घोटाळ्याचे कनेक्शन दिल्लीपर्यंत पोहचले असल्याचे उघड झाले आहे. त्यात चौकशीमध्ये खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांचे  देखील आरोपींकडून बेकायदेशीररित्या सीडीआर विकत घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे भारतीय दंड विधान संहिता कलम420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66, 72, 72 (अ) प्रमाणे पंडित यांच्या गुन्हा दाखल करून त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पथकाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. ही कारवाई झाली त्यामुळे अनेक नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.