बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2024 (09:01 IST)

पोलिसांचा खबरीच निघाला अट्टल चोर; 28 तोळे सोने केले हस्तगत

नाशिक युनिट -1च्या पथकाने शिताफिने ताब्यात घेतलेल्या पोलीस मित्र म्हणून वावरनाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराकडून नाशिकरोड पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने सात गुन्हे उडकीस करून सुमारे साडेसाळा लाखाचे 28 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.तर दुसऱ्या गुन्हेगाराकडून दहा लाख किमतीच्या 74 खतच्या गोण्याची चोरी व चोरी साठी वापरलेले वाहन उघडकीस आणल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
 
पोलीस आयुक्तलयातील परीमंडळ दोन मध्ये  गुन्हे घडकीस येण्याचे प्रणाम वाढले असून गुन्हेगारामध्ये याचा जबर बसला आहे. या बाबत अधिक माहिती देतांना उपायुक्त राऊत म्हणाल्या कि, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी युनिट एक कडून ताब्यात घेतलेल्या विशाल उर्फ पप्पु प्रकाश गांगुर्डे वय 38राहणार कैलाजी सोसायटी, जेलरोड नाशिकरोड या कडून शिताफिने तपास करून उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील तर नाशिकरोड येथील सहा चोऱ्या, जबरी चोरी च्या गुन्ह्यातील साडे सोळा लाख किंमतीचे 28तोळे 6ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले. हे चोरलेले सोने विकत घेणाऱ्या प्रशांत विष्णूपंत नागरे, हर्षल चंद्रकांत म्हसे व चेतन मधुकर चव्हाण या सराफना गुन्हात ताब्यात घेतले आहे.
 
विशाल उर्फ पप्पु  गांगुर्डे या संशयित आरोपी हा कर्जबाजारी झाला होता. पोलिसाचा खबरी, पोलीस मित्र म्हणून परिसरात वावरत होता. तो  क्रीडा क्षेत्रात प्रविण्यदार होता. पोलिसांच्या जवळ असल्याने त्याला गुन्हा केल्यानंतर पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात याची माहिती होती. म्हणून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हता.शेवटी युनिट एक ने त्याच्या मुसक्या आवळल्या आणि नाशिकरोड पोलिसांनी त्याला बोलते केले.
 
खताच्या गोण्याची चोरी उघडकीस
जसबीर सिंग अमरीक सिंग राहणार आनंद निवास,आशीर्वाद बस स्टँड,यांच्या सुभाष रोड येथील गोडावून मधून खताच्या गोण्याची चोरी झाली होती. नाशिकरोड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास गुन्हे शोध पाथक करीत असताना पोलीस कर्माचारी अरुण गाडेकर यांना माहिती मिळाल्या नुसार त्यानी आकाश रामचंद्र चिकने (वय 29)राहणार रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्कारोड, गुलाब वाडी यास ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्यांची कबुली देत त्याच्या कडून पाऊणे दोन लाख किंमतीचे 74खताच्या गोण्या व गुन्ह्यात वापरलेले आठ लाखचा आयशर ट्रक असा नऊ लाख 83हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या दोन्ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके,गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोलीस हवालदर विजय टेमगर, विष्णू गोसावी, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळ, भाऊसाहेब नागरे, कल्पेश जाधव, सचिन वाळुंज, केतन कोकाटे, बोडके,रानडे पार पाडली.
 
उपायुक्त बच्छाव यांनी केले अभिनंदन
दोन गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव हे नाशिकरोड पोलीस ठाण्यात आले. उघडकीस आणलेले गुन्ह्याची माहिती घेऊन त्यानी उपायुक्त राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांचे अभिनंदन केले.