सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (08:25 IST)

केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावतात : मुंडे

भाजपचे नेते ईडी,सीबीआय,इनकम टॅक्स अशा अनेक केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावतात,असा गंभीर आरोप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय सुडाचे राजकारण केलं जातंय.हे केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला कळून चुकलं आहे,असाही आरोप मुंडेंनी केला.
 
धनंजय मुंडे म्हणाले,सुरुवातीपासूनच अतिशय सुडाचं राजकारण केलं जात आहे हे केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला कळून चुकलं आहे.भाजपचे अनेक नेते केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन चौकशा लावत आहेत.त्यामुळे खरं काय हे सर्वांच्या समोर येणार आहे.सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्याचं स्पष्ट झालंय.खरं काहीच नाही,गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तीलाही बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे.हे भाजपचं ठरलेलं तंत्र आहे.
 
३०-३० वर्षे अधिकारी एकाच ठिकाणी काम करत असतील तर त्यांची बदली व्हायला पाहिजे हे स्वाभाविक आहे. कायदा-नियमाला धरुन सर्व बदल्या केल्यात,असं सांगत धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातीलअधिकाऱ्यांच्या बदल्याच्या निर्णयाचं समर्थन केलं.