बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (21:03 IST)

ठरलं शिवसेनेचा वर्धापन दिन वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होणार

शिवसेनेचा वर्धापन दिन हा उद्या वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होईल. तसेच मुख्यमंत्री हे प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती हॉटेल वेस्टीनमधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार सध्या याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
 
राऊत म्हणाले, याच हॉटेलमध्ये उद्या प्रत्यक्ष वर्धापन दिन साजला होईल. मुख्यमंत्री उद्या सकाळी वेस्टीनमध्ये येतील आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करतील. संपूर्ण देशाचं लक्ष हे मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे.. शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापनदिन सोहळ्याला राजकीय महत्व हे नेहमी असते. प्रत्येक वर्धापण दिन हा महाराष्ट्राला दिशा देत असतो, ज्या पद्धतीन महाराष्ट्रावर आक्रमण सुरू आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष, लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊतांनी दिली आहे.
 
शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षांत अंतर्गत मतभेद नसतात. तर गावकडील आमदरांना याठिकाणी कधी राहायला मिळणार? ही एक व्यवस्था असते, महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे. आमदरांना मार्गदर्शन करता यावं यासाठी याठिकाणी ठेवण्यात आलं आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत अनेक तांत्रिक बाबी असतात, त्या गोष्टी शिवसेना नेते आमदरांना याठिकाणी समजावून सांगत आहेत, अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली आहे.