testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नागपूर : उद्योजक जयस्वाल पितापुत्रांना अटक

Last Modified बुधवार, 14 जून 2017 (09:24 IST)

नागपूरचे उद्योजक आणि अभिजीत ग्रुपच्या जयस्वाल पितापुत्रांना अटक करण्यात आली आहे. मनोज जयस्वाल आणि त्यांचे पुत्र अभिषेक जयस्वाल यांना कोलकात्यात ईडीनं अटक केली.

मनोज जयस्वाल हे कोळसा घोटाळ्यातील मोठं नाव आहे. कर्ज थकवल्याप्रकरणी बँकांच्या तक्रारी आल्यानंतर ईडीनं ही कारवाई केली.
अभिजीत जयस्वाल हे दर्डा कुटुंबियांचे निकटवर्तीय आहेत. विजय दर्डा यांचंही नाव कोळसा घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये आहे. मनोज जयस्वाल यांनी विजय दर्डा यांच्यासोबत एकत्र येत कोळशाचा उद्योग सुरु केला होता.यावर अधिक वाचा :