शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: धुळे , सोमवार, 2 जुलै 2018 (09:00 IST)

लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू

साक्री तालुक्यात लहान मुलांना पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयावरून आदिवासींनी सात जणांना मारहाण केली असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर मारहाण झालेल्यांपैकी दोघे पळून जाण्यात यशस्वी झालेत. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.राईनपाडा (ता. साक्री) येथील ग्रामस्थांनी या कोंडूनलोकांना खोलीत कोंडून ठेवत मारहाण केल्याचे हे कृत्य केल्याची माहिती मिळत असून दगडांनी चेहरे विद्रुप केल्यामुळे मृतांची ओळख पटलेली नाही. पाचही जणांचे मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.वृत्त काळातच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम रामकुमार घटनास्थळाकडे दाखल झाले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे हेदेखील साक्रीकडे रवाना झाले आहेत.  सातारा आणि सांगलीतील सातजण राईनपाड्यात आले होते. बाजार असल्यानं मुलं पळवायला टोळी आल्याची अफवा यावेळी गावात पसरली. यानंतर ग्रामस्थांनी पाचजणांना ठेचून मारलं. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अप्पा श्रीमंत भोसले आणि राजू भोसले अशी हत्या करण्यात आलेल्या पाचजणांची नावं आहेत. हे सर्व जण भिक्षा मागून जगत होते अशी माहिती मिळाली आहे. 
 
दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून नागरिक दहशतीखाली आहेत. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे.याचाही औरंगाबाद, नंदुरबार आदी ठिकाणी अशाच संशयावरून मारहाणीच्या घटना घडल्या असून संधी दिसताच लोक हात साफ करून घेतात मात्र यावेळी थेट पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडिया वरून अशा अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे उतावीळ नागरिकांनी चौकशी करून पोलिसांना माहिती देणे महत्वाचे आहे.यात पोलीस कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात याकडे लक्ष आहे.