शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (08:25 IST)

जळगाव : हतनुर धरणाचे सर्व दरवाजे उघडले

जळगाव : सध्या राज्यातील काही भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. (Rain) राज्यातीन अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मंगळवारपासून चिपळूण, रायगड, रत्नागिरी, कोल्हापर, मुंबईसह पश्चिम उपनगर तसेच ठाणे, डोबिंवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, वसई, विरार आणि नालासोपारा येथे मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

दरम्यान, रायगड, चिपळूण तसेच कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalgad) (इरसालगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. तर मुसळधार पावसामुळं अनेक तलाव, धरण तुडंब भरली आहेत. त्यामुळं धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत.
 
हतनुर धरणाचे सर्व दरवाजे उघडले
दरम्यान, तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तरी हतनुर धरणात येणाऱ्या येव्यानुसार टप्प्या टप्प्याने हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत हतनूर धरणाचे सगळे दरवाजे म्हणजे पूर्ण 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहे. 137093 एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे, अशी माहिती  शाखा अभियंता, एस जी चौधरी यांनी दिली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor