मणिपूर चकमकीत जवान रंजीत यादव शहीद
मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराच्या घटना सुरु आहे. सेरो येथे 5 जूनच्या मध्यरात्री सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे एक जवान शहीद झाले तर दोन जवान गंभीर जखमी झाले. अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये बीएसएफचे जवान रणजित यादव शहीद झाले.
भारतीय लष्कराच्या स्पिअर कॉर्प्स यांनी या बाबत माहिती दिली ते म्हणाले की, 5 -6 जूनच्या रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात सेरो/सुगनू येथे बीएसएफचा जवान गंभीर जखमी झाला तर दोन आसाम रायफलचे जवान जखमी झाले.गोळी लागून जखमी झालेले बीएसएफचे जवान सीटी/जीडी रणजित यादव यांना ककचिंग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित केले.
मणिपूर मध्ये हिंसाचार थांबविण्यासाठी सुरक्षा दलाकडून कडक बंदोबस्त असताना राज्यात
हिंसाचाराच्या घटना घडत आहे. मणिपूरच्या सेराउ भागात झालेल्या हिंसाचारात झालेल्या गोळीबारात एक बीएसएफचे जवान गंभीर जखमी झाले असून आसाम रायफल्सचे दोन जवान जखमी झाले आहे.मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने इंटरनेट बंदी 10 जूनपर्यंत वाढवली आहे
Edited by - Priya Dixit