30 एप्रिलपर्यंत जेतिबा मंदिर बंद; चैत्री यात्राही रद्द
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि जेतिबा मंदिर मंगळवारपासून 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. श्री जेतिबाची चैत्री यात्रा आणि श्री अंबाबाईचा रथोत्सव सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. मंदिरामध्ये केवळ नित्यनैत्तिक पूजा-अर्चना सुरू राहणार आहे याची भाविकांनी नोंद घवी, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी 2020 मध्ये यात खंड पडला आणि या वर्षीही (2021) कोरोनामुळेच यात्रा रद्द करण्यात आली आहे. 2020 च्या आधी 1899 मध्ये प्रमथच जोतिबाची चैत्री यात्रा रद्द करण्यात आली होती. तेव्हा प्लेगची साथ असल्याने या बंदचा आदेश देण्यात आला होता.