मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जुलै 2018 (17:20 IST)

राज्यात महाभरती : पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागा

महाराष्ट्र सरकारने 72 हजार जागाच्या नोकरभरती साठी काम सुरु केले आहे. या मेगा भरतीत पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे तरुणांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत.
महाभरतीसाठी जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्य स्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख यांची समिती असणार आहे.
यासाठी परीक्षा पद्धती निश्चित झाली आहे. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबींवर 25 टक्के गुण असतील गट क आणि गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
गृह विभाग- 7 हजार 111 पदे
कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
जलसंपदा विभाग- 827 पदे
जलसंधारण विभाग- 423 पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे