गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (16:00 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी पुण्यातून पत्रकाराला अटक

sharad panwar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याप्रकरणी बुधवारी पुण्यातून एका पत्रकाराला अटक करण्यात आली. या प्रकरणातील 115 आरोपींपैकी 109 जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 
 
8 एप्रिल रोजी पवार यांच्या घराबाहेर झालेल्या निदर्शने आणि हल्ल्याच्या घटनेमुळे मुंबईचे झोन 2चे डीसीपी योगेश कुमार यांना यापूर्वीच हटवण्यात आले आहे. पवार यांच्या घराबाहेर एमएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 115 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या पत्रकाराला मुंबईत आणण्यात येत आहे.