मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (15:19 IST)

Jumbo Covid Center scam case: ईडी कडून जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आठ हजार पानाचे आरोपपत्र दाखल

bed
Jumbo Covid Center scam case:कोरोनाच्या काळात जंबो कोविड सेंटरच्या साहित्य खरेदी मध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीने केला असून या प्रकरणात संजय राऊतांचे निकटवर्तीय  मानले जाणारे सुजित पाटकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात ईडी कडून न्यायालयात आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात बीएमसी अधिकारी आणि काही नेत्यांना  सुमारे 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची सोन्याची बिस्किटे, गोल्ड बार, आणि सोन्याच्या नाणी देण्यात आल्याचा दावा केला आहे. 
 
वरळी  आणि दहिसर च्या कोविड सेंटर मध्ये अनियमितता झाली असून दहिसरच्या कोविड सेंटर मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता होती. मात्र तिथे 100 टक्के कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.या मुळे  रुग्णासाठी भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडण्याचा दावाही या आरोप पत्रात करण्यात आला आहे. 

ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात सुजित पाटकर हे प्रमुख आरोपी आहेत. कोर्टाकडून या आरोपपत्राची दखल घेण्यात आली असून, सर्व आरोपींना चार ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 4 ऑक्टोबरला दोषारोप निश्चित होणार आहेत. सुजीत पाटकर, हेमंत गुप्ता,  संजय शहा, राजीव साळुंखे, अरविंद सिंग आणि डॉ किशोर बिसुरे असे या जंबो कोविड सेंटर प्रकरणातील आरोपी आहे. 
 
 Edited by - Priya Dixit