शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (23:55 IST)

राज्यात 6 जून 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा होणार

shivaji maharaj
राज्यात यंदा 6 जून सोमवार रोजी 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला होता. हा दिवस महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या दिनी राज्यातील सर्व ग्राम पंचायती, पंचायत समित्या जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळी भगवा स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्याला अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट गीताचे गायन करावे. तसेच या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकार ने केले आहे. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र्रात राज्यातील ग्राम पंचायती, पंचायत समित्या व जिल्हापरिषद कार्यालयांमध्ये 'शिव स्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंघाने या दिवशी कार्यक्रम साजरे केले जाणार आहे.