गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (08:59 IST)

इंदोर येथील भाविकास नाशिकमध्ये जबर मारहाण

kalsarp pooja in nashik

त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प शांती पूजा करण्यासाठी आलेल्या इंदोर येथील भाविकास पुरोहितानेच जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये 'कौस्तुभ विकास मुळे' या पुरोहितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार प्रसाद पटेल (41,507,कॉसमॉस सिटी,विचौली मर्दना)  हे 29 जानेवारीला पूजेसाठी त्र्यंबकेश्वरला आले होते. त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता संशयित मुळे यांनी माझ्याकडे सर्व पूजा केल्या जातील असे फिर्यादीस सांगितले. किती पैसे होतील असे विचारले असता पुरोहिताने 3 हजार होतील असे सांगून पूजा पूर्ण केली. मात्र पुरोहितांनी पैसे देताना पाच हजाराची मागणी केली. त्यामुळे दोघात वाद होऊन पुरोहिताने फिर्यादि पटेल याना चोप दिला. तसेच त्यांच्या 9 वर्षीय मुलीसही धक्काबुक्की केली.  पोलिसांनी कलम 323, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.