मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (08:07 IST)

2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न

कराडमध्ये आपल्या दोन लहान बालकांचा गळा दाबून आईनेच हत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर खुद्द आईनेच आत्महत्येचा  प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे कराड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना कराड येथील रुक्मिणी नगर परिसरात  घडली आहे. 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, हर्ष आवटे  (वय, 8 वर्ष) आणि आदर्श आवटे  (वय, 6 वर्ष) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. तर अनुष्का सुजित आवटे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून पतीचा विरह सहन होत नसल्याने आम्ही आमचे जीवन संपत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. अनुष्का यांचे पती सुजित यांचा सुमारे सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचा विरहामुळे आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे अनुष्काने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. या दरम्यान, अनुष्का यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.