शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 डिसेंबर 2023 (15:13 IST)

Khopoli : महिला बस कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल मारहाण

women fight
सोशल मीडियावर अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीच्या अनेक व्हिडीओ पहिले आहे. आता खोपोलीच्या नगर परिषदेच्या बसची वाहक आणि महिला प्रवाशात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघींमध्ये सुट्ट्या पैशावरून वाद झाला नंतर त्याचे हाणामारीत बदल झाले. हाणामारी होताना पाहून काही प्रवाशांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. 
 
हे प्रकरण खोपोलीच्या नगरपरिषदेच्या बस मधले आहे. महिला प्रवाशी ने तिकीट काढलं. मात्र बसच्या कंडक्टर कडे तिला देण्यासाठी सुट्टे पैसे नव्हते. या वरून दोघींमध्ये वादावादी झाली. या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाले.इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवला.   
या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Edited by - Priya Dixit