शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 मे 2017 (11:27 IST)

कोल्हापूर : नांगरे- पाटील यांच्या गाडीला अपघात, ते सुखरुप

कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्या गाडीचा सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात ते सुखरुप आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. यावेळी ते मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले. त्यावेळी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील विमानतळाकडे जात असताना उजळाईवाडीजवळ त्यांच्या सरकारी गाडीचा अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने जात असताना एका वळणावर त्यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असणा-या खड्यात जाऊन पडली. 

 या अपघातात विश्वास नांगरे- पाटील किरकोळ जखमी झाले असून  त्यांच्यासह तिघेजण सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.