गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (22:24 IST)

मराठमोळ्या तरुणाने जिंकली ऍपल स्पर्धा

apple photo
कोल्हापूरच्या मराठमोळ्या इंजिनीअर तरुणाने जागतिक स्पर्धेत उंच भरारी घेत अॅप्पल कंपनीने आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत स्वत:ने टिपलेल्या अनोख्या फोटोला पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे.
 
प्रज्वल चौगुले या तरुणाचे नाव आहे. त्याने काढलेल्या फोटोची जगभरात चर्चा होत आहे. प्रज्वल कोल्हापूरचा असून इंजिनीअर आहे. प्रज्वलला निसर्गाच्या विविध रुपाचे फोटो काढायची आवड आहे. तो मॉर्निंग वॉकला जात असताना त्याला कोळ्याच्या जाळ्यावर दवबिंदू पडल्याचे दिसून आले. त्याने लगेच आपल्या आयफोन 13 प्रो मध्ये फोटो टिपला. 
 
अॅप्पल कंपनीने शॉट ऑन आयफोन ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती. ज्यात फोटो मागविण्यात आले होते. या स्पर्धेत प्रज्वलला पहिल्या 10 मध्ये निवड झाली आहे.