testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.साळुंखे

shramik
Last Modified सोमवार, 4 सप्टेंबर 2017 (17:32 IST)
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उद्घाटक तर समारोपास
पी साईनाथ,
डॉ.रावसाहेब कसबे,
उत्तम कांबळे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) तर्फे आयोजित पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन दि. १० व ११ सप्टेंबर,२०१७ रोजी जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक व विचारवंत तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द विचारवंत व इतिहास तज्ञ डॉ. आ.ह. साळुंखे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तसेच जेष्ठ पत्रकार व लेखक पी साईनाथ,विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे,
जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे,
संमेलन समारोपाचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

सिटूच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनात दोन दिवस विविध विषयांवर तीन परिसंवाद,
कवी संमेलन,सांस्कृतिक कार्यक्रम,
ग्रंथ सन्मान मिरावणूक,
विशेष गौरव यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके,ज्येष्ठ कांदबरीकार दिनानाथ मनोहर,
ज्येष्ठ पत्रकार व लेखक महावीर जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी संमेलन समारोपात
‘श्रमिक संस्कृती पुढील आव्हाने’
या विषयावर सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद होईल. यात ज्येष्ठ पत्रकार व लेख पी साईनाथ,
प्रसिध्द लेखक व विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे,
लेखक व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे,शेतमजूर युनियन महाराष्ट्राचे संस्थापक कॉ. कुमार शिराळकर यांचा सहभाग राहणार आहे.
पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनास कामगार,
शेतकरी,
शेतमजूर,
मध्यमवर्गातील साहित्यिकांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :