सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:03 IST)

'ती' टोळी पोलिसांनी पकडली

मुंबईत लालबागमध्ये विसर्जन मिरवणूकी दरम्यान मोबाईल चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी दादर जीआरपीने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान लालबाग परिसरातून तब्बल १६२ मोबाईल चोरीला गेले आहेत. याआधी  काळाचौकी पोलीस स्थानकात याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा दर्शनाच्या दहा दिवसात तब्बल दीडशे भक्तांचे मोबाईल चोरी झाले आहेत. याशिवाय सोनसाखळ्या आणि पाकीट मारल्याच्या घटनांची संख्या मोठी आहे.