1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. latur

लातूर मध्ये पश्चिम बंगालच्या मुली वैश्याव्यवसायात

लातूरातल्या लॉजेसला वाईट दिवस आले आहेत. लॉजेस चालत नाहीत, बंदही करता येत नाहीत. लॉजेस चालू ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो, किंवा तरुण तरुणींना ‘सहारा’ दिला जातो. अशाच एका लॉजवर लातूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने धाड टाकली. स्क्रॅप मार्केट परिसरातील आनंद लॉजमध्ये पश्चिम बंगालच्या दोन तरुणी, एक गिर्‍हाईक आढळून आले. हॉटेल मालक किशोर तळेकर, व्यवस्थापक चंद्रशेखर क्षिरसागरला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई करण्यासाठी दोन डमी गिर्‍हाईक पाठवण्यात आले होते. औशाचे पोलिस उपाधिक्षक गणेश किंद्रे, एपीआय दंडिमे, पीएसआय गणेश कदम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही मोहीम यशस्वी केली.
पुढील लेख
लावणीच्या तालावर खवय्ये इंदूरी