मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लातूरला मिळाला अखेर परिवहन सभापती

दीर्घ प्रतिक्षेनंतर लातूर महानगरपालिकेला आज परिवह्न सभापती मिळाला. भाजपच्या सर्व सभासदांनी मंगेश बिराजदार यांची सर्वसंमतीने निवड केली. आज सकाळी दहा वाजता मनपाच्या सभागृहात भाजपाचे सदस्य जमले. भाजपच्या सर्वांनी मंगेश बिराजदार यांच्या नावाला पसंती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी इटनकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. उपस्थित १३ सदस्यात भाजपच्या सात आणि कॉंग्रेसच्या सहा सदस्यांचा समावेश होता. कॉंग्रेसच्या वतीने सिद्राम उटगे यांनी तर भाजपच्या वतीने मंगेश बिराजदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हात वर करुन मतदान घेण्यात आले, त्यात बिराजदार यांना सर्वाधिक सात मते पडली. 
 
महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थेचा आढावा घेऊन यात काय सुधारणा करता येतील त्या करु, बसेसची संख्या वाढवू, नागरिकांची अंतर्गत परिवहनाची सोय करु अशी माहिती नवे सभापती मंगेश बिराजदार यांनी दिली. यावेळी महापौर सुरेश पवार, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मगे, शिवदास मिटकरी, व्यंकट वाघमारे, हनुमंत जाकते, गणेश गोमचाळे, नीरज गोजमगुंडे, दुर्गेश चव्हाण, महेश कौळखेरे यांच्यासह भाजपा आणि कॉंग्रेस सदस्यही उपस्थित होते.