मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :लातूर , रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (19:57 IST)

पेट्रोल पंपावरुन निघाल्यानंतर भीषण अपघात

Fatal accident after leaving the petrol pump
लातूर जिल्ह्यात टेम्पोने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले तर तिसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे. जांब ते शिरूर-ताजबंद रस्त्यावर हा अपघात झाला. रस्त्यावरून धावणाऱ्या टेम्पोने भरधाव वेगाने येत या मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे मोटरसायकलवरील तिघांनाही अपघात झाला. मात्र दोन तरुण जागीच ठार झाले. तर जमलेल्या नागरिकांनी तिसऱ्या तरुणाला तत्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.  

पेट्रोल भरल्यानंतर निघाल्यावर अपघात
याविषयी अधिक माहिती अशी की, मोटर सायकलवर निघालेले हे तिघे जण चेरा येथील रहिवासी होती. चेरा येथून ते जांबच्या दिशेने निघाले होते. जांब जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून रस्त्यावर येताच त्यांना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने धडक दिली. यात मोटर सायकलवरील दोघांचा मृत्यू झाला.