मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (17:18 IST)

गौतमीने हात जोडून मागितली अजितदादांची माफी

gautami patil
लावणी क्वीन म्हणून प्रसिद्ध गौतमी पाटील सध्या नेहमीच चर्चेत असते. गौतमीचा डान्स बघण्यासाठी तरुण प्रचंड गर्दी करतात तर अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना विरोध होत आहेत. 
 
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका अशी कार्यकर्त्यांना ताकीद दिली आहे. या नंतर गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया देत अजित दादांची हात जोडून माफी मागितली आहे. “दादा माझ्याकडून काही चुकलं असल्यास मला माफ करा,” असे गौतमीने म्हटले आहे.
 
नुकतीच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची बैठक पार पडली तेव्हा सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता. या नंतर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
 
दरम्यान अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर गौतमी पाटीलने आपल्या सादरीकरणामध्ये सुधारणा केल्याचे सांगितले होते. ती म्हणाली की दादा खूप मोठे असून मी त्यांना काही बोलू शकत नाही. मात्र माझं एकच म्हणणं आहे की याआधी माझ्याकडून काही चुका झाल्या आणि मी त्या सुधारल्या पण तरीही  माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा, असे गौतमीने म्हटले आहे.