मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (15:08 IST)

कायदा माझ्या बापाने लिहला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा,सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केल

sushma andhare
प्रक्षोभक भाषण करणे शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच भोवल्याचं दिसत आहे. कारण, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी कायद्याची भाषा केली आहे.
 
ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा मेळावा पार पडला. या जाहीर मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलीन केली.
“नोटीसीला कायदेशीर उत्तर…”

“मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. मिळाली तर पोलीस ठाण्यात हजर होईल. कारण, कायदा माझ्या बापाने लिहला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा. त्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल,” असेही अंधारे यांनी स्पष्ट केल.
Edited By- Ratandeep Ranshoor