शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (21:37 IST)

विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचाच होऊ शकतो- जयंत पाटील

Anil Patil
सध्याचे संख्याबळ बघता विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचाच होऊ शकतो. कॉंग्रेसने शिवसेना आणि राष्ट्र्वादी कॉंग्रेससोबत बसून याबाबत चर्चा करावी, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी दिली. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची निवड केली होती. ही निवड आता नावापुरती राहण्याची शक्यता आहे.
 
जयंत पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. विधिमंडळात सध्या कॉंग्रेसचे संख्या बळ अधिक आहे. त्यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळायला हवे. कॉंग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करावी, असे जयंत पाटील यांनी सांगितले.


Edited By - Ratnadeep Ranshoor