रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (13:07 IST)

फुकट योजना कशा राबवायच्या हे भुजबळांकडून शिका : राऊत

फुकट योजना कशा करायच्या हे छगन भुजबळ यच्याकडून शिका असे कौतुकोद्‌गार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काढले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन याचे उत्तम उदाहरण आहे. शासकीय पैसे खर्च न करता त्यांनी सर्वात चांगली इमारत उभी केली असल्याचे राऊत यांनी सांगितले. 
 
महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. भाजपने तत्कालीन आघाडीसरकारमधील सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात रान उठवले होते. आता राऊत यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवा उंचावल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना राऊत यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्षे राहणार आहे. महाराष्ट्राला देशातील पहिले राज्य करायचे असल्याचेही राऊत यांनी सांगितले. शिवभोजन ही राज्य सरकारची पालट योजना असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार मख्यमंत्री लवकरच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुजबळ यांनी राऊत यांचे कौतुक केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असे आम्ही सर्वजण बोलायचो. तसेच राऊत हे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल सांगत होते. राऊत यांनी हिंमत दिली त्यांचे कौतुक करायला हवे असेही भुजबळ यांनी सांगितले.