बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (07:59 IST)

मॉन्सूनपुर्व पावसाने मुंबईत लोकलचा बोजवरा, राज्यात अनेक भागांत पाऊस

mansoon
वादळी पावसामुळे राज्यांत अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंंडीत
 
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात लोकलचा खोळंबा झाला असून ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्ग ठप्प झाला आहे. तसेच घाटकोपर स्थानकातही काही वेळेसाठी लोकल ठप्प झाल्याचं चित्र आहे. कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर शॉर्टसर्किटमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल ट्रेन 20 मिनटं थांबली आली. आता लोकल पुन्हा सुरू झाली आहे. राज्यतील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.
 
वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने संध्याकाळी 7.15 पासून ठाणे वाशी मार्ग बंद आहे. मात्र ठाणे पनवेल, ठाणे नेरूळ, मार्ग सुरू आहे. ज्यांना वाशीला जायचे आहे त्यांना जुई नगरला उतरून जावे लागणार आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर देखील घाटकोपर स्थानकात ठाणे लोकल ठप्प झाली आहे. पाऊस सुरू असल्याने ओव्हर हेड वायर आणि पेंटाग्राफ मध्ये होत आहे.
 
मुंबईत पाऊस
 
पूर्व मुंबई उपनगर मध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी संध्याकाळच्या वेळेस बरसल्या. त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र अचानक पडलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची मात्र धावपळ झाली असली तरी हवेतल्या गारव्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. पूर्व मुंबई उपनगर मध्ये मुलुंड भांडूप कांजुरमार्ग विक्रोळी परिसरात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. मात्र या पावसामध्ये फुटबॉल खेळून पहिल्या सरीचा आनंद देखील लुटताना नागरिक दिसून येत होते.
 
नाशिकमध्ये पाऊस सुरू
 
नाशिक शहरासह ग्रामीण भागात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. नाशिक शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. मात्र त्यानंतर 6 वाजेपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना यामुळे थोडा का होईना पण दिलासा मिळाला.
 सुमारास रायगड जिल्ह्यात मानसून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या आगमनाने सारेच सुखावले असून उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पावसाने आपली हजेरी लावल्याने अडगळीत टाकलेल्या छत्र्या बाहेर पडल्या तर बच्चे कंपनीने पहिल्याच पावसात भिजण्याचा आनंद लुटला.