शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (09:53 IST)

लोणावळा लोकल धावणार, ई-पास दाखविल्यानंतरच प्रवासाचे तिकीट मिळणार

लोणावळा लोकलसाठी पोलिसांकडून देण्यात आलेले क्युआर कोड आधारित ई-पास दाखविल्यानंतरच प्रवासाचे तिकीट मिळणार आहे. मोबाईल किंवा स्थानकावरील मशीनद्वारे तिकीटाची सुविधा बंद असल्याने मार्गावरील प्रत्येक स्थानकावर तिकीट खिडकीमधूनच तिकीट घ्यावे लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
 
राज्य शासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर येत्या सोमवार (दि. १२) पासून लोणावळा लोकल धावणार आहे. मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या लोकलने प्रवास करता येणार आहे. पुणे व लोणावळ्यातून सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक लोकल सुटणार आहे. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.
 
पुणे पोलिसांकडून लोकलने प्रवास करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्युआरकोड आधारीत ई-पास दिले जाणार आहेत. हे पास दाखविल्यानंतर तिकीट खिडकीवर तिकीट दिले जाणार आहे. ई-पास असल्याशिवाय स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.