रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2023 (07:42 IST)

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.
 
प्रशांत रविंद्र शिंदे (वय १९) व प्रतीक्षा समीर शिंदे (वय १४) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. मृत परीक्षा ही अल्पवयीन आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत व प्रतीक्षा यांचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध घरातील नातेवाईकांना समजले तर अडचणीचे होईल, या भीतीने ते दोघे बुधवारी रात्री ९ वाजता घरातून निघून गेले होते. त्या दोघांनी गावातीलच बाळासाहेब शंकर पाटील यांच्या शेतातील बांधांवरील लिंबाच्या झाडाला एकाने ओढणीने तर दुस-याने दोरीने गळफास घेतला.
 
प्रतीक्षा ही नरखेड येथील विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती तर प्रशांत हा अकरावीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी रुग्णालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती पोलिस पाटील अरुण पाटील यांनी दिली असून तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करत आहेत.